पायाड । रफिक सुरज
पाने : 112 । किंमत : 175/- । पेपरबॅक
वास्तू निर्माण विश्वात गुंतलेल्या माणसांच्या जीवनातील विविध समस्यांचा वेध रफिक सुरज यांनी पायाड या कथासंग्रहातून घेतला आहे. हे विश्व भ्रष्टाचार, भौतिक सुखलोलुपता, फसवणूक या वृत्तींनी पोखरत गेले. पैसा हा या विश्वाचा आधार बनला तरी हे विश्व साकार करणाऱ्या कारागिरांच्या, मजुरांच्या जीवनातील समस्या संपलेल्या नाहीत. भूकक्षमानासाठीचा करावा लागणारा संघर्ष आणि जगण्याला ग्रासून असलेली अभावग्रस्तता अपूर्णता यामुळे माणसांना कधीकधी नैतिकता सोडून अनैतिक मार्ग धरावा लागतो. अशी परिस्थितीसमोर हतबल ठरलेली, वाकणारी, मोडून पडणारी तर कधी तिच्यावर मात करणारी माणसे या कथेत अवकाशाचे एकत्व असले तरी कथांतर्गत अनुभव भिन्नतेमुळे कथेतील आशयसूत्रात विविधता आली आहे. मलिदा, पायाड, तुंबारा अशा शीर्षकांमधून कथाशयात सूचक भाषारूपे आली आहेत. संवादाच्या वापराने कथेतील निवेदनाला गती देणाऱ्या शैलीच्या वापरामुळे निवेदनाचा पसरटपणा कथेत जाणवत नाही.
– गोविंद काजरेकर
Reviews
There are no reviews yet.