Click Image for Gallery
लेखन : अमिता नाईक / रूपेश पाटकर
किंमत 120 रु. / पाने 88
मी देखील एक कामगार. मी संघटित क्षेत्रात काम करत होते. जोपर्यंत माझ्या बाबतीत काही घडले नव्हते, तोपर्यंत मलादेखील जगात सागळे चांगले चाललेय असे वाटत होते. जेव्हा मला फसवून कामावरून कमी करण्यात आले, तेव्हा मला पहिल्यांदाच वेगळे ‘दर्शन’ झाले. माझ्या कंपनीतील इतर कामगारांप्रमाणे मी या अनुभवाकडे माझे नशीब म्हणून पाहून दुर्लक्ष केलेही असते, पण काही मित्रमैत्रिणींनी मला दिलेल्या वेगळ्या नजरेमुळे मला वेगळे ‘दर्शन’ झाले. या दर्शनामुळे मला माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगाकडे कामगारांच्या नजरेतून बघण्याची सवय झाली. या सवयीतून या गोष्टी मी लिहिल्या