Click Image for Gallery
वर्जेश ईश्वरलाल सोलंकी
किंमत 60 रु. / पाने 44
पेरुमल मुरुगन आपल्या भोवती साक्षात घडलेली दंतकथा. लेखकाने स्वत:ला मृतच जाहीर केलं. कारण काय तर ‘सत्य’ बोलण्यावर झालेला आक्रमक, हिंसक, बेदरकार आघात. वर्जेश त्याच दंतकथेला मराठी समूह संचितात, आवाजात परावर्तित करतो आणि आपल्याभोवती घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय, आर्थिक वास्तवाला मध्यवर्ती उभं करून नवं काही रचतो. त्या रचनेचं नाव आहे ‘पेरुगन मुरुगन’.
– राजन गवस