Click Image for Gallery
लक्ष्मीकांत देशमुख
देशाने स्वीकारलेल्या कुरूप बाजारप्रणीत विकासनीतीमुळे इथला तरूण अस्वस्थ आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि स्त्रीचं विक्रय होणारं वस्तुकरण झालं आहे. या अशा आजच्या विपरीत वर्तमानाचा एक्सरे रिपोर्ट लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘गाव विकणे आहे’ या संग्रहातील कथांमधून वाचकांपुढे निर्दय सहानुभूतीने प्रस्तुत केला आहे.