-25% दयन । युवराज मेघराज पवार । Dayan । Yuvraj Meghraj Pawar

दयन । युवराज मेघराज पवार 

पाने : १८८ । किंमत : ३००/-

मुखपृष्ठ : सरदार जाधव

 

मायबाप हो....!

तुम्हीच म्हणतात

शिका...

शिकलो ss

विद्वानांच्या पंगतीत बसा

बसलो...

सांगाss... !

बोला...!

मी कुठे चुकलो...?


घोड्याच्या पायात नाल ठोकावी तसा हा प्रश्न व्यवस्थेच्या कपाळावर सणसणीत ठोकून देणारा ‘दयन कादंबरीतला नायक डॉ. गणेश मोहन जाधव, जो एक सी. एच. बी प्राध्यापक आहे. सी. एच. बी. प्राध्यापकाची अवस्था वेठबिगार कामगारापेक्षाही बथ्थड आहे. कोरडवाहू शेतकऱ्यापेक्षाही दयनीय. असे असूनही त्याच्या  दु:खाला समजाव्यवस्थेत जराही सहानुभूती नाही. शिक्षणसम्राट आणि सरकारी यंत्रणेच्या गिरणी व्यवस्थेने जाणूनबुजून ज्यांच्या आयुष्याचे दळण ( दयन ) पीठ केले आहे; त्या सर्वाचे वास्तव ठळकपणे कादंबरीतून समोर आले आहे. कादंबरीच्या शीर्षकाची समर्पकताच सांगते की व्यवस्थेनं सामान्य माणसाचे पीठ करून टाकले आहे. त्याच्या आशा आकांक्षा, त्याची स्वप्ने साऱ्यांचेच ‘दयन’ करून टाकले आहे. ही एकट्या गणेश जाधवची गोष्ट नाही. व्यवस्थेने टाचेखाली रगडलेल्या त्या हरेकाची गोष्ट आहे. युवराज पवार यांच्या लेखणीचे यश म्हणजे त्यांनी हा विषय अतिशय टोकदारपणे कादंबरीत हाताळला आहे. मराठी कादंबरी विश्वात ही कादंबरी अतिशय वेगळी ठरते, संवादशैली जी बोलीभाषेवर आधारलेली आहे तिचा अप्रतिम वापर लेखक करतो. शिवाय प्रसंग, निवेदन, वातावरण निर्मिती इ. बाबत, एखाद्या कसबी लेखकासारखी लेखणी 'दयन' या कादंबरीत युवराज पवार यांनी चालवली आहे. त्यामुळे मराठी कादंबरी विश्वात ‘दयन’ कादंबरी आपलं अजोड स्थान निश्चित करेल यात कुठलीही शंका नाही.

- ऐश्वर्य पाटेकर

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

दयन । युवराज मेघराज पवार । Dayan । Yuvraj Meghraj Pawar

  • Views: 455
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: दयन । युवराज मेघराज पवार । Dayan । Yuvraj Meghraj Pawar
  • Availability: 99
  • Rs. 300
  • Rs. 225
  • Ex Tax: Rs. 225

Tags: दयन, युवराज मेघराज पवार, Dayan, Yuvraj Meghraj Pawar, नवे पुस्तक, कादंबरी