-35% दस्तावेज । आनंद विंगकर । Dastavej । Anand Wingkar

दस्तावेज । आनंद विंगकर

मुखपृष्ठ : सरदार जाधव


गेटफोल्ड । पाने : ५०४ । किंमत : ६५०/-

प्रकाशनपूर्व सवलत मूल्य : ४२० + ४० टपाल खर्च


( प्रकाशनपूर्व नोंदणी ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मर्यादित )


आनंद विंगकर या मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखकाची 'दस्तावेज' ही कादंबरी म्हणजे आत्मचरित्र आणि सर्जनशील कथन या दोन वाङ्मयप्रकारांचा हृद्य आणि प्रभावी असा मेळ आहे. परिवर्तनवादी राजकीय चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या आत्मशोधाचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला अतिशय गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या गाभ्याचे दर्शन घडवतो. ग्रामीण सरंजामी व्यवस्थेतील कृषक व श्रमिकांच्या जगण्याचे धारदार कंगोरे, जातवास्तवात पिचणारे स्त्रीपुरुष, मुंबईसारख्या महानगरात जगण्यासाठी गेलेल्या ग्रामीण माणसांची परवड, त्यांना तगून रहायला मदत करणाऱ्या स्त्रिया - हे वास्तव तर विंगकर आपल्या भाषेतून सजीव करतातच; पण बाजारावर आधारित आर्थिक धोरणांनी या साऱ्याच घटकांची केलेली ससेहोलपट, आणि त्यात बदलाव आणू पहाणाऱ्या तरूण धुमाऱ्यांना ऊर्जा देत, व्यवस्थेविरुध्द लढण्यासाठी संघर्षसिध्द करणारे डावे पक्ष आणि त्यांचेही अंतर्गत राजकारण... यांचाही विस्तीर्ण पैस  हा दस्तावेज आपल्यासमोर उलगडत जातो. या बहुआयामी वास्तवाला जिवंत आणि अर्थपूर्ण करते ती माणसामधील माणुसकीची प्रेरणा, अधिक सुंदर मानुष जगाच्या निर्मितीची आस. त्यातून होते इतिहासाच्या खऱ्या नायकाची जडणघडण. त्यातूनच घडते त्याचे स्वत्व आणि खरे आत्मभान!

मराठी कादंबरीला एक नवा राजकीय आयाम देणारा हा ‘दस्तावेज’ खऱ्या अर्थाने मैलाचा दगड आहे.

- माया पंडित

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

दस्तावेज । आनंद विंगकर । Dastavej । Anand Wingkar

  • Views: 125
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: दस्तावेज । आनंद विंगकर । Dastavej । Anand Wingkar
  • Availability: 95
This Offer Expires In:
  • Rs. 650
  • Rs. 420
  • Ex Tax: Rs. 420

Tags: दस्तावेज, आनंद विंगकर, Dastavej, Anand Wingkar, नवे पुस्तक, कादंबरी