-25% अभुजमाड । भुजंग मेश्राम । Abhuj Maad । Bhujang Meshram

अभुजमाड । भुजंग मेश्राम

पाने : २४४ । किंमत : ४००/-

·

     अरण्यवस्तीतून आलेल्या, गोंडी मातृभाषा असेलल्या, पन्नाशीच्या आतच हे जग सोडून निघून गेलेल्या भुजंग मेश्राम यांच्या कविता समकालीन मराठी कवितेतला प्रखर, आणि अनन्यसाधारण टप्पा आहे.

प्रचंड सर्जनशक्ती, अद्भुत भाषासामर्थ्य, कुठल्याही कवितेत प्रमाण भाषेतून बोलीभाषेत आणि बोलीभाषेतून प्रमाण भाषेत अगदी सहजपणे होणारी अकृत्रिम स्थित्यंतरे, विलक्षण शब्दयोजना आणि नव्या व अर्थसंपृक्त शब्दरूपांची निर्मिती, समकालीन जागतिक वास्तवाची जाण, भावात्मकतेतून बौद्धिकतेत होणारे संक्रमण, बौद्धिक आकलनातून येणारा खोलवरचा व तीव्रतर उपहास-उपरोध, अनुभवांनाच ज्ञानतंतू करण्याचा प्रयत्न, अढळ बांधिलकी इत्यादी अनेक गुणवैशिष्टयांनी भुजंग मेश्राम यांची कविता महत्त्वाची झाली आहे. समकालीन जगण्यातल्या एकूणएक घटना-विकार-विचारांचे धागेदोरे राजकीय वास्तवाशीच जोडलेले आहेत. या त्यांच्या दृढ विचारामुळे त्यांची कविता अनन्य होते.

- चंद्रकान्त पाटील   

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

अभुजमाड । भुजंग मेश्राम । Abhuj Maad । Bhujang Meshram

  • Views: 215
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: Abhuj Maad । Bhujang Meshram
  • Availability: 97
  • Rs. 400
  • Rs. 300
  • Ex Tax: Rs. 300

Tags: अभुजमाड, भुजंग मेश्राम, Abhuj Maad, Bhujang Meshram, कवितासंग्रह, नवे पुस्तक