Click Image for Gallery
सकोन ।
रामराव अनिरुद्ध झुंजारे
कथासंग्रह
पाने :
२७६ । किंमत : ३५०/-
प्रा. रामराव
अनिरुद्ध झुंजारे यांनी अनुभवलेलं समाजवास्तव हा या कथासंग्रहातील कथांचा गाभा आहे.
जाती-धर्माच्या नावाने, भाषा-प्रांताच्या नावाने कात्रीने कापड फाडावे तसा समाज फाडला
जातोय. फाटलेल्या समाजाला जोडण्याची भाषा म्हणजे 'सकोन'. शांती, संयम, सहिष्णुता, एकात्मता
शिकविणारी विज्ञाननिष्ठ कथा सकोन मध्ये आहे. मुक्या माणसांची भुकेल्यांची भाकरी बनून कथांच्या नायिका खंबीरपणे
नवं परिवर्तन घडवितात. दलित, उपेक्षित, वंचित आणि पीडित वर्गाला न्याय मिळवून देणाऱ्या
आणि परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला विचार देणाऱ्या या कथा आहेत.