धर्मग्रंथ
आणि मानवी जीवनप्रवाह । रावसाहेब कसबे
पाने : ४९८
। किंमत : ५००/-
'धर्मग्रंथ
आणि मानवी जीवनप्रवाह' हा ग्रंथ विविध ज्ञानशाखांच्या आधारे मानवी विकासक्रम स्पष्ट
करून, या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.
या प्रयत्नात भगवद्गीता आणि कुराण या मानवजातीवर प्रभाव गाजविणाऱ्या महान ग्रंथांनी
पार पाडलेली सामाजिक,आर्थिक आणि राजकीय भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. या दोन ग्रंथांनी
मानवी मनाची जी जडण-घडण केली आहे, त्या प्राचीन आणि मध्ययुगीन योगदानाची समीक्षा करून
आजच्या गतिमान आणि प्रवाही मानवी जीवनावर या ग्रंथाच्या प्रभावाने कोणकोणते बरे-वाईट
परिणाम होत आहेत याचे विवेचन, जगात वाढत असलेला मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद यांच्या कारवायांच्या
पार्शवभूमीवर केले आहे.
हा ग्रंथ
आजच्या मूलतत्ववादाने आणि दहशतवादाने भयभीत झालेल्या मानवजातीस स्वतःचे आणि इतरांचे
जगणे सार्थ आणि सुंदर करण्यासाठी एक नवी दृष्टी देईल आणि या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी
निर्भय बनवील असा विश्वास वाटतो.