Click Image for Gallery
खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ । सुनीता सावरकर
पाने :३६ । किंमत : ३०/-
कु. सुनीता सावरकर यांची ही पहिली छापील पुस्तिका. संशोधन हा त्यांचा पिंड. 'महाराष्ट्रातील दलित चळवळीमधील अंतर्गत वादाचे चिकित्सक विश्लेषण १९२०-१९४०' हा त्यांचा एम.फील. चा संशोधन विषय होता. त्यांचे पीएच.डी. चे संशोधनही अंतिम टप्प्यात असून 'दलित चळवळीतील वैचारिक मतभेद' हा त्यांचा प्रबंध-विषय आहे.
मुळात आंबेडकरी चळवळीचे विविध पैलू, या चळवळीतील विविध समाजघटकांचा
सहभाग ठळक करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. 'खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी
चळवळ' ही संशोधन पुस्तिका याच प्रयत्नातील एक महत्त्वाचे पॉल आहे.
- प्रा. ल. बा. रायमाने