संसदेचे
शब्दचित्र : मनन आणि स्मरण १९५२-१९७७ । हिरेन मुखर्जी
अनुवाद
: संजय चिटणीस
पाने :
१८० । किंमत : २५०/-
'टॉम जोन्स' या आपल्या प्रख्यात कादंबरीत हेन्री फिल्डिंग यांनी धर्मगुरू थ्वाकम यांच्या मुखाद्वारे धर्माबद्दल काही चटकदार निरीक्षणे नोंदवली आहेत : '' मी जेव्हा धर्माचा उल्लेख करतो तेव्हा माझ्या मनात ख्रिश्चन धर्म असतो आणि केवळ ख्रिश्चन धर्म अभिप्रेत नसून प्रोटेस्टंट धर्मही माझ्यासमोर असतो आणि प्रोटेस्टंट धर्मच नव्हे तर इंग्लंडचे चर्चही अभिप्रेत असते.''
या पुस्तकात 'संसद' असा जो उल्लेख येईल तो मुख्यतः लोकसभेच्या अनुषंगाने असेल. तिलाच देशाचे सरकार जबाबदार असते. याचा अर्थ असा नव्हे, की राज्यसभेला प्रस्तुत शब्दचित्रात स्थान असणार नाही. पण स्वाभाविकपणे ते काहीसे पक्षपाती असेल. त्याचबरोबर न सांगताच हे समजून घ्यायला हवे, की या शब्दचित्रामागे एक दृष्टिकोन आहे; जो काही वाचकांना अनेकदा विचित्र वाटेल. त्यामुळे चूकभूल आढळली तर त्याबद्दल नाइलाज आहे. अर्थात राज्यसभेच्या स्वभावरेखनाद्वारे संसदेचे संमिश्र चित्र शक्यतो प्रामाणिकपणे व खरेपणाने रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच फलश्रुती म्हणजे निरनिराळ्या स्वभावाच्या सभासदांचे त्यांच्या मनोवृत्तीनुसार त्यांनी वेळोवेळी बजावलेल्या कामगिरीसह चित्रण या पुस्तकात आहे.