मी एक सारंगी । आत्मजीत । भाषांतर : मेघा पानसरे
पाने :
८० । किंमत : १५०/- । मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
उदास तुकडे जोडणारे गीत
जी गीते
बहुधा ऐकू येत नाहीत किंवा जी ऐकायला परवानगी नाही, खरं तर तीच गीते नाटकात कहाणीला
पूर्णत्व देतात...
आपली गीते
ऐकली जावीत, अशी जर स्त्रीची इच्छा असेल, तिला जर स्वत:च्या निवडींनी परिपूर्ण असं
जीवन स्वत:च्या इच्छेनुसार जगायचं असेल, तर तिने या समाजातील आव्हाने स्वीकारली पाहिजेत.
त्यांचा सामना केला पाहिजे आणि त्यातून पार पडलं पाहिजे.
- गीता हरिहरन, लेखिका, दिल्ली
‘मी एक
सारंगी’ या त्यांच्या नाटकात आत्मजीत आपल्यासारख्या सरंजामी आणि पुरुषप्रधान समाजात
स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अमानवीकरण आणि अवमानाकडे कठोर आणि तिरकस कटाक्ष टाकतात.
आत्मजीत
नेहमीच मानवी व्यवहारामागील नेणिवेच्या अशा मानसशास्त्रीय गहनतांचा उत्कटतेने शोध घेतात,
ज्या मानवी विवेकाच्या सीमांना आव्हानही देतात आणि त्या स्पष्टही करतात. पंजाबी समुदायाच्या
अशा कमी प्रकाशातील क्षेत्रांचा त्यांना खोल वेध घ्यायचा असतो, जिथे अगदी पूर्णत: प्रशिक्षित
मनोविश्लेषकही पाऊल ठेवायला घाबरतात.
- प्रा. राणा नय्यर, पंजाब विद्यापीठ, चंदिगड
लेखकाने
निषेध केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे, आपल्या भोवतालच्या कुरूप गोष्टी, ऱ्हास,
विघटन, अमानवीपणा यांना प्रश्न विचारला पाहिजे. आत्मजीत साहित्यातील अशा दुर्मीळ लेखकांचे
प्रतिनिधित्व करतात, आणि म्हणूनच ते वेगळे आहेत. अत्युत्कृष्ट लेखक आहेत.
- फख्र जमान, लेखक, पाकिस्तान