-10% भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा । संपादक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे । Bhau Padhye Yanchya Shreshth Katha

भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा । संपादक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

मुखपृष्ठ : मिलिंद कडणे

 

पाने : ३५२ । किंमत : ४००/-

 

''व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ते स्वत: आहेत आणि नाहीतही. त्यांचे प्रत्येक पात्र निवेदनात आपला रास्त हिस्सा घेते, आपली बाजू मांडते. न्यायाधीशाशिवाय चाललेले हे खटले आहेत. परस्परविरोधी दावे करणारे आणि स्वत:ची वकिली करणारे लोक, आरोप करणारे, अपराध करणारे, साक्ष देणारे, निकाल देणारे असे अनेक निवेदकांचे स्वर भाऊंच्या लेखनात आपल्याला ऐकू येतात. मग कळते की हा एक समाजाचा गलबला आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे...

... वर्गमुक्त , वर्णमुक्त, लिंगभेदनिरपेक्ष अशी जी मानवतावादी दृष्टी भाऊंच्या लेखनात आहे ती सर्वस्वी सेक्युलर इहवादी आहे. कोणत्याही राजकीय विचारप्रणालीची ढापणे या दृष्टीला लावलेली नाहीत. कोणतीही विभाजनशील किंवा संकुचित कलात्मक विचारसरणी तिला रंगीत चष्मा चढवत नाही. वाङ्मयाद्वारा जीवनाकृतीचे चित्रण करणे हा एकमेव उद्देश भाऊंच्या वाङ्मयाच्या मुळाशी आहे.''

- दिलीप पुरुषोत्तम चित्रे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा । संपादक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे । Bhau Padhye Yanchya Shreshth Katha

  • Views: 664
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा
  • Availability: 96
  • Rs. 400
  • Rs. 360
  • Ex Tax: Rs. 360

Tags: भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा, संपादक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे, Bhau Padhye Yanchya Shreshth Katha, कथा, चौथी आवृत्ती