ज्ञानेश्वरीतील व्याख्या व संबोध । रवींद्र छोटू पाटील
पाने : २०८ । किंमत : २५०/-
मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
ज्ञानेश्वरीत भगवद्गीतेच्या पदांचे केवळ उलगडणे नाही; तर गीतेपलीकडे जाऊन आत्मरुपाची संकल्पना, व्यभिचारी भक्त, जातिवर्ण हे तो गा अकारण, संन्याशाची कुटुंबातील संकल्पना, खळांची व्यंकटी सांडो, मूर्तिपूजेची मर्यादा असे जागोजाग आत्मानुभव योगी ज्ञानेश्वर प्रकट करीत आहेत.
ज्ञानेश्वरी समाजचिंतन नाही. गीतेचा चिकित्सक अभ्यास नाही वा चिकीत्सक इतिहास नाही. साहित्याचा विस्मयकारक आनंद नाही. पंडित व विचारवंत कधी संत होत नाहीत. विचारवंत,चिकित्सक संशय या पातळीवर राहतात. कारण ते बुद्धी,तर्क,विचारांची कास सोडत नाहीत. तृष्णेचा बंध तोडत नाहीत. त्यामुळे त्यांचे मनही मावळत नाही. मग ज्ञानाची वाटचाल थांबते. ज्ञानेश्वरी प्रात्यक्षिक अनुभवाचा ग्रंथ आहे. आत्मरूपाचा शोध घेणाऱ्या ध्यानस्थांचा मार्ग आहे.