Click Image for Gallery
ऐन विणीच्या हंगामात । पुनीत मातकर
मुखपृष्ठ : सरदार जाधव
पाने : १९२ । किंमत : २५०/-
'हे कोणते ऋतू आलेत ?' अशा प्रश्नव्याकुळ समकालाने पुनीत मातकरांची
कविता आकाराला आली आहे. जागतिकीकरणोत्तर काळानंतर निर्माण झालेल्या महापेचाची आणि अंतर्विरोधाची
जाणीव पुनीत मातकर यांच्या कवितेत आहे. नवभांडवली समाजातील बेदखल, दुःखी आणि शोषित
समाजाच्या यातनांचा गडद स्वर या कवितेत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षीच्या ग्रीष्म झळा,
जखमी चंद्राचे तुकडे आणि वर्तमानाचे अंगावर चाल करून येणे या भावजाणिवेला या कवितेत
केंद्रस्थान मिळाले आहे.
- प्रा. रणधीर शिंदे