परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा । संपादक : किशोर बेडकिहाळ
( वसंत पळशीकर यांचे निवडक लेख )
पाने :३२१ । किंमत : ३५०/-
ज्येष्ठ विचारवंत श्री. वसंत पळशीकर यांनी १९७९ ते २००१ या कालखंडात सामाजिक,राजकीय वाङ्मयीन विषयांवर लिहिलेल्या दहा निवडक लेखांचा हा संग्रह आहे. मार्क्सवाद, समाजवाद, जागतिकीकरण अशा विषयांसोबतच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची पळशीकरांनी चिकित्सक पद्धतीने व अभ्यासपूर्ण रितीने मांडणी केली आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांचा संदर्भ वर्तमानातील वास्तवाशीही सहज जुळतो, कारण त्यात विचारांची 'अस्सलता' आहे आणि कोणत्याही प्रश्नांकडे बंदिस्तपणे न पाहता साक्षेपी दृष्टिकोनातून पाहण्याची प्रगल्भता आहे. म्हणूनच प्रस्तुत संग्रहातील पळशीकरांचे लिखाण आपल्याला प्रश्नांकडे समग्रतेने पाहण्याचे भान देऊन विषयाचा खोलवर विचार करायला लावील यात शंका नाही.
अभिनिवेशाचा अभाव, संकल्पनांची
चोख समाज व स्पष्टता, ऐतिहासिक परिप्रेक्ष्याचे भान, उपहास/उपरोध किंवा औद्धत्य यांचा
अभाव, वाचकांची समज वाढविण्याची क्षमता, परिभाषेची अवडंबर टाळणारी भाषा, गंभीर व काटेकोर
पण त्याचवेळी संवादाचा प्रत्यय देणारी सुघटित शैली या सर्वांचा प्रत्यय या संग्रहात
पदोपदी येईल.