Click Image for Gallery
निवडक भारत सासणे । संपादक : प्रदीप कर्णिक । चंद्रकांत भोंजाळ
पाने : १८८ । किंमत : २२५/-
भारत सासणे यांच्या साहित्यातील पात्रांकडे पहिले तर असे दिसून
येते की, विविध संस्कृतींतील, घटकांतील, परंपरांतील पात्रे इथे वावरतात. भिकारी,आंधळे,लहानमुले,
कुरूप तरुण, विचित्र आडनावांची माणसे, कुरुपतेमुळे लग्न होऊ न शकलेले आणि वय वाढत चाललेले
तरुण, महारोगी, गुंड, रस्त्यावर वस्ती करून राहणारे लोक, लग्न न होऊ शकलेल्या स्त्रिया,
मूल होऊ न शकलेल्या स्त्रिया, आजारी स्त्री, मरणाची वाट बघणारे म्हातारे, मुले परदेशी
असल्याने एकाकी झालेले वृद्ध दांपत्य, दुष्काळामुळे देशोधडीला लागलेला मजूर, स्थलांतर,
भूक, भविष्याच्या ओढीने पळणारी कर्मदरिद्री माणसे अशी कितीतरी पात्रे सासणेंच्या कथा-दीर्घकथांमधून
येतात.