-10% दस्तखत । प्रकाश जाधव । Dastkhat । Prakash Jadhav

दस्तखत । प्रकाश जाधव

पाने : ६४ । किंमत : १५०/-

मुखपृष्ठ : सरदार जाधव

 

गिरमिटासारखी पोखरणारी अस्वस्थता हा प्रकाश जाधवच्या कवितेचा प्राण.

समुद्राच्या झंझावाती लाटांनी तमाम केरकचरा किनाऱ्याला लोटावा तद्वत तो त्याच्या बहिष्कृत दुनियेतील उघडं- बोडकं वास्तव कवितेत आणून लोटतो. हे सारेच तळापासून चितारतांना त्याचे अनुभव ज्वालामुखेसारखे खदखदत असतात. त्या दुनियेची अनाकलनीय भाषा, त्यांच्या वासना, त्यांचे संघर्ष आणि नवजीवनाचा वेध घेण्याची युयुस्तुवृत्ती यांचे सळसळते दर्शन प्रकाशच्या कवितेत घडते. केवळ शिष्टसमाजाला धक्का देण्यासाठी त्याच्या कवितेत लिंगवाचक शब्द-प्रतिमा येत नाहीत; तर ज्या वर्गाचे तो आपल्या कवितेत प्रतिनिधित्व करतो तेथील माणसांच्या सर्व विकारांना तो धारिष्ट्याने सामोरे जातो. प्रकाशने स्पर्श केलेले जीवन मराठी साहित्याने पाहिले नाही असे नाही, पण पुरासारखी धो धो वाहाणारी शब्दसंपदा आणि ठाम लयीत पडणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे शब्द यात आकलनाच्या बाबतीत फरक होऊ शकतो. वरवर दिसणारा थंडपणा आपणास तळापासून ढवळून काढतो.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

दस्तखत । प्रकाश जाधव । Dastkhat । Prakash Jadhav

  • Views: 3498
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: Dastkhat । Prakash Jadhav
  • Availability: 49
  • Rs. 150
  • Rs. 135
  • Ex Tax: Rs. 135

Tags: दस्तखत, प्रकाश जाधव, Dastkhat, Prakash Jadhav, कवितासंग्रह, नवे पुस्तक