Click Image for Gallery
अस्वस्थ दिवसांची सुगी । कविता म्हेत्रे
पाने : १२० । किंमत २००/-
कविता म्हत्रे यांच्या कवितेत 'स्त्री' संदर्भातील जाणिवव्यूह
केंद्रस्थानी आहे. तो दुःखद आणि यातनादायी आहे. भारतीय समाजातील स्त्रीजीवनाच्या दुखऱ्या
नात्यांचे मनोगतरूप या कवितेत आहे.
'बाई' पणाच्या 'घडवणुकी'च्या संघर्षभूमी टकरावातून निर्माण
झालेल्या भावसंवेदना या कवितेत आहेत.
भूतकाळातील भावसंचिताची हवीहवीशी साद या काव्य संवेदनशीलतेला
जवळची वाटते. भूतकाळातील नात्यांचे बंध, निसर्ग, स्मृतिरूपांचा आठवपाठलाग या कवितेतून
अभिव्यक्त झाला आहे. या विसंवादाच्या स्वराला एक समांतर संवादी स्वर आहे. तो अंतरिकतेशी
जवळीक साधणारा आहे. एकाच वेळी आंतरिकता आणि बाह्य दाबांच्या सरमिसळीतून उद्भवलेली ही
कविता आहे.