धग असतेच आसपास
कवयित्री : कल्पना दुधाळ
किंमत : १५० । पाने : १२०
कष्टानं पिचलेल्या अन हातून पुन्हा पुन्हा निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या सुखाच्या क्षणांकडे,
मूठभर दाण्यांकडे विनातक्रार पाहणाऱ्या सामान्य कष्टकरी माणसांविषयीच्या कळवळ्यातून ही कविता आकार घेते. शेती -माती, भूमी
आणि निसर्गाचे माणसांशी असलेले नाते शोधात ती आपल्या
मुळांशी असलेलं आदिम नातं
बदलत्या दाहक पर्यावरणात जपू पाहते. आसपासच्या धगीत तगून राहण्याची जिद्द बाळगते. तिची जिजीविषा त्यामुळेच आत्महत्येचं निमंत्रण
देणाऱ्या परिस्थितीला नाकारण्याचं धाडस दाखवते आणि
जगण्याचे ताणेबाणे स्वीकारायला लावणारा प्रेरणादायी
शब्द होते.
नात्यातल्या विरूपतेची दुःखपूर्ण अवस्था मांडत, सत्त्व जपण्याचा ध्यास असलेल्या
या कविता एका परिपक्व मुक्कामापर्यंत पोचल्या आहेत. त्यांचा पुढील प्रवास अधिकाधिक
जीवनशोधाकडे जाणारा असेल असा विश्वास देणारा हा कवितासंग्रह आहे.