Click Image for Gallery
पोटमारा
लेखक : रवींद्र पांढरे
किंमत : १६० । पाने : १२८
पोटाला पोटभर जेवण न मिळणं म्हणजे पोटमारा. तसंच अधिकार असूनही
न्याय्य हक्कांपासून वंचित राहावं लागणं म्हणजेही एक प्रकारचा पोटमाराच. सामान्य
शेतकऱ्याला आज सर्व बाजूंनी अशा पोटमाऱ्याला सामोरं जावं लागतंय. प्रस्तुत कादंबरी
अशा सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्याच्या परवडीची प्रातिनिधिक शोकांतिका वास्तवदर्शी
पद्धतीने मांडते.
आयुष्यभर माध्यमिक शिक्षकाची नोकरी करावी लागूनही गावाची शेती, शिवार,
गावातले लोक, बोली यांच्याशी लेखकाची जन्मजात
जुळलेली नाळ तुटलेली नाहीय. हृदयाला स्पर्श करणाऱ्या बोलीत सांगितलेली ही कथा वाचणाऱ्याच्या काळजाला चटका लावते. त्याला अंतर्मुख
करते, अस्वस्थ करते.