Click Image for Gallery
आजकालचे प्रश्न
लेखक : उत्तम कांबळे
पाने : २०० / किंमत : ३०० रु.
काही वेळेला प्रश्न बदलत जातात. उत्तरंही बदलत जातात.
काही वेळा प्रश्न जुनेच असतात. त्यांची उत्तरं सापडत
नाहीत.
काही वेळा जुने प्रश्न नवे रूप घेऊन उभे ठाकतात.
काही वेळा प्रश्नांची चकवा देणारी उत्तर सापडतात,
तर काही वेळा ती सापडतच नाहीत. काहीही असो,
सामान्य माणसाचं भोवताल हे नेहमी प्रश्नांनी भरून
रहात असतं.
कुठून आणता उत्तरं, असं आव्हान ते देत असतं तरीही माणूस उत्तरं शोधण्याचा
प्रयत्न करतोच.
नव्या सहस्रकातल्या दुसऱ्या दशकाच्या आसपास गर्दी
असलेल्या काही प्रश्नांचा हा उच्चार तुम्हाला विचार करायला लावतो आणि गाईड न वापरता
उत्तरं शोधा म्हणतो.