Click Image for Gallery
काही
सांगताच येत नाही
कवी
: प्रमोदकुमार अणेराव
किंमत
: १६० । पाने : १०८
प्रमोदकुमार
अणेराव हे समकाळाचे सूक्ष्म संवेदन टिपणारे नव्वदोत्तर पिढीतील महत्वाचे कवी आहेत.
मानवी जीवनाच्या संस्कृतिविशिष्टय आणि प्रकृतिविशिष्टय मूल्यव्यवस्थेची, विचारव्यूहाची
जागतिकीकरणाने केलेली पडझड, वाताहत "काही सांगताच येत
नाही" या कवितासंग्रहातून त्यांनी प्रभावीपणे मांडली आहे.
"काही सांगताच येत नाही"मधील कविता आवाजी नाही,
पण तिच्यातील विचारसूत्राचा नाद आपल्या बोधनेत दूरवर निनादत राहतो. प्रमोदकुमार
अणेरावांच्या "विरामचिन्हांचा मृत्यू'मधील कवितेचा
प्रवास 'काही सांगताच येत नाही" या कवितासंग्रहात एका
निश्चित आणि वेगळ्या वळणावर आलेला आपणांस ठळकपणे दिसतो.