-10% पाण्याशप्पथ

पाण्याशप्पथ

लेखक : प्रदीप पुरंदरे

किंमत 200 रु.

 

सिंचन प्रकल्प म्हणजे प्रस्थापित विकास नीतीचा ग्रामीण व शहरी भागांना पाण्याने जोडणारा बालेकिल्ला! समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष त्या बालेकिल्ल्यापर्यंत न्यायचा असेल तर सिंचन व्यवस्था नीट अभ्यासा, प्रकल्पस्तरावर परिणामकारक हस्तक्षेप करा, आहे त्या व्यवस्थेत प्रथम लोकसहभाग वाढवा, ती राबविण्याचा प्रयत्न करा, जनरेटा निर्माण करा आणि मग व्यवस्था बदलाचे प्रयत्न करा...

सिंचन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेले जनसमूह आणि सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात असूनही पाणी न मिळणारे 'कोरडवाहू बागायतदार' दोघेही प्रकल्पबाधित! शेतीवरचा 'भार' हलका करणारी क्रूर धोरणे आणि पाणी वाटपातील पराकोटीची विषमता यांच्या घातक आघाडी व युतीचे बळी! ते आज मराठा क्रांती मूक मोर्चात मोठ्या संख्येने दिसतात. शेती आणि पाणीसंदर्भातील असंतोष त्या विषयीच्या आंदोलनांअभावी आज अस्मितेच्या राजकारणातून व्यक्त होतो आहे. पाणी हे सर्वव्यापी असते ते असे!

२०१२ ते २०१६ या कालावधीत पाण्यासंदर्भात राज्यात बरंच काही घडत होतं. सिंचन घोटाळा, जलसंकट, दुष्काळ... त्या काळातले हे लिखाण, समकालीन मुद्द्यांबाबत, पाण्याशप्पथ, खरे सांगणारे, भूमिका व बाजू घेणारे. सिंचन व्यवस्थेचा तपशील व तथ्ये मराठीत प्रथमच, लोकाभिमुख दृष्टिकोनातून. जलवंचितांच्या पाण्यासाठी.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

पाण्याशप्पथ

  • Views: 447
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: पाण्याशप्पथ
  • Availability: 999
  • Rs. 200
  • Rs. 180
  • Ex Tax: Rs. 180

Tags: पाण्याशप्पथ