चिकानो चळवळ
लेखक : प्रा. किसन चोपडे
किंमत 250 रु. / पाने 180
चिकानो चळवळ : मेक्सिकन अमेरिकनांच्या नागरी हक्कांच्या चळवळीचा इतिहास
मेक्सिकन, मेक्सिकन - अमेरिकन, स्पॅनिश - अमेरिकन, टेक्सास विलीनीकरणाने अमेरिकन झालेले मेक्सिकन, ग्वादालुपे कराराने नागरिकत्व मिळालेले मेक्सिकन, ब्रासिरो कराराने प्रवेश घेतलेले पण चोरून राहणारे मेक्सिकन, वैध कागदपत्रासह आलेले मेक्सिकन, वैध कागदपत्रे नसणारे मेक्सिकन, ज्यांच्या आई वडिलांचा जन्म मेक्सिकोत झाला पण मुलाचा जन्म अमेरिकेत झाला असे मेक्सिकन, ज्यांचा जन्म मेक्सिकोत पण अमेरिकन नागरिकत्व मिळविलेले मेक्सिकन, अशा अनेक गटांत हे मेक्सिकन विभागले गेलेले आहेत. त्यामुळे या मेक्सिकनांचे म्हणजेच चिकानोचे प्रश्न तेवढेच असून अमेरिकन संघ व्यवस्थेत राज्यनिहाय समस्यांचे स्वरूप बदलत जाते. पण उदरनिर्वाहासाठी पैसा कमावणे हेच एकमेव ध्येय प्रत्येक मेक्सिकनाचे असल्यामुळे आपल्या इतर समस्यांच्या बाबतीत त्यांच्यात उशिरा जाणीव निर्माण झाली. अशा अनेक खोड्यांत चिकानो चळवळ अडकल्याने २० व्या शतकाच्या मध्यानंतर म्हणजे तब्बल ११० वर्षांनंतर चळवळीला अंकुर फुटले.