Click Image for Gallery
आम्ही लटके ना बोलू
लेखक
: महावीर जोंधळे
किंमत
200 रु. / पाने 145
प्रगतीचा, आर्थिक सत्येचा, ज्ञानवर्धनाचा, साहित्य, संगीताचा यशस्वी लंबक आपल्याच बाजूनं कसा राहील याची काळजी घेणारा वर्ग राजकारणाचा दोर आणि सत्तासोपणाचे पाय आपल्या हाती ठेवण्यासाठी पडद्याआडून फासे टाकत असतो. तर दुसरा वर्ग लोकसंख्येतील आपला मोठा आकडा पुढं करून सत्तेत सत्ता नावाच्या घोड्याचा लगाम सतत आपल्या हाती राहावा याकरिता कृष्णकारस्थानाचा वारंवार उद्योग करीत राहतो. त्यामागे हेतू एकच असतो. उपेक्षित गरीब आणि वंचितांना गोंडे घोळीत आपल्यामागे पुढे फिरावे. प्रसंगी टाळ्या वाजवाव्यात. ढोल बडवावेत. 'नाचू राजकारण्याची रंगी ' म्हणत म्हणत प्रहसन रंगवावे. पटलं नाही तरीही नंदी बैलासारखी मान हलवावी. पार मानेचा काटा ढीला होईपर्यंत!