Click Image for Gallery
डॉ.
आंबेडकरांची जातीमीमांसा
लेखक
: उमेश बगाडे
किंमत
50 रु. / पाने 92
विचारवंतांचे
विचार सूत्ररूपाने मांडणे, त्यासाठी लागणारे संकल्पनात्मक भाषेची जुळवाजुळव करणे आणि
त्याची सैद्धांतिक स्पष्टता व दर्जा कायम राखणे ही संशोधकाची मूलभूत जबाबदारी असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अचूकपणे समजावून घेताना सैद्धांतिक सूक्ष्म आशय आत्मसात
करण्याचे आव्हान प्रस्तुत ग्रंथात डॉ. उमेश बगाडे यांनी पेलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
जातीमीमांसेची वैशिष्ट्यपूर्ण परिमाणे स्पष्ट करून त्यांच्या विचारांना आकलनाच्या उच्चत्तम
पातळीवर त्यांनी नेऊन ठेवले आहे.