कैफी
आझमी : जीवन आणि शायरी
लेखक
: लक्ष्मीकांत देशमुख
किंमत 350 रु.
कैफी
आझमी यांच्या एकूणच लेखनात 'मेरी आवाज सुनो' हे अर्थपूर्ण सूत्र त्यांनी आपल्या जगण्यासाठी
आणि लेखनासाठी वापरले आहे. त्यांच्या काही महत्त्वाच्या कवितांचे या निमित्ताने होणारे
उल्लेख आणि त्यामागचे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातले सूर आपल्याला पाहता येतील.
कैफीच्या शायरीचा सगळा सूर हा त्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षातूनच पाहता यावा.
औरत, सोमनाथ, साप, बहुरूपनी आणि दुसरा वनवास यासारख्या अनेक कविताखंडात केलेले उल्लेख
लक्षात घेण्यासारखे आहेत. त्यांची सिनेमातली गाणी ही मुद्दामहून सिनेमासाठी लिहिलेली
आहेत, असे कुठेही वाटत नाही. ‘बिछडे सभी बारी बारी’ यासारखे थीम साँग आणि ‘वक्तने किया
क्या हसी सितम’ हे आपणाला इथेही पाहाता येतील. एकाच वेळेला संघर्षांची तीव्र धार आणि
दुसऱ्या अंगाने जगण्यातल्या प्रेमाच्या आर्त आठवणी हे कैफीचं खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी
आपल्या अस्सल कवितेपासून कुठेही फारकत घेतली नाही किंवा आपल्या विचारांपासून जराही
दूर गेले नाहीत.
-
सतीश काळसेकर