कारवाँ-ए-मुहब्बत अर्थात प्रेमाची वारी
मूळ इंग्रजी लिखाण : हर्ष मंदेर.
मराठी संकलन, अनुवाद व रुपांतर : स्वातिजा
मनोरमा, प्रमोद मुजुमदार
किंमत 50 रु. / पाने 64
आम्ही
स्वत:ला लोकशाहीवादी भारतीय नागरिक समजतो.
आमच्यापैकी
प्रत्येकाला वाटते की आपण सहिष्णू आहोत, उदारमतवादी आहोत;
आम्ही
खरचं तसे आहोत?
गोवंशीय
प्राणी मारण्याच्या संशयामुळे एखाद्या व्यक्तीला कायदा, न्यायालय बाजूला ठेऊन जमावाने
एकत्र येऊन ठार मारणे हे आमच्या सहिष्णूतेचे लक्षण मानायचे का?
देशात
आज हा ‘हिंसक झुंडीचा न्याय’ प्रस्थापित होत आहे.
धार्मिक
अल्पसंख्य, दलित समाजातील निरपराध माणसांच्या सामूहिक हत्या केल्या जात आहेत.
हे
आम्हाला मान्य आहे का?
देशातील
धार्मिक,जातीय विद्वेषाने प्रेरित जमावी हिंसेचा प्रतिरोध करण्यासाठी सुरु झाली
‘प्रेमाची
वारी’…
त्या
वारीने देशातील आठ राज्यात अशा जमावी हिंसेचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी
घेतल्या. त्यांची दु:ख जाणून घेतली. त्याचा हा लेखाजोखा!
तुम्हा-आम्हाला प्रश्न विचारणारा, कृतीचा
मार्ग सुचवणारा वास्तवदर्शी अहवाल.
मानवी
यातना समजून घेणारी..
सहवेदना
व्यक्त करणारी..
प्रेमाचा
आणि सहिष्णूतेचा संदेश देणारी..
माणूसकी जागवणारी जनयात्रा..