आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज
लेखक : डॉ. सोमनाथ कदम
किंमत 300 रु. / पाने 192
डॉ सोमनाथ कदम यांनी “आंबेडकरी
चळवळीतील मातंग समाज” हे पुस्तक लिहून आंबेडकरी चळवळीतील अंत:प्रवाहांच्या
अभ्यासाला चालना दिली आहे. भारतीय समाजात जात हे एक वास्तव असून, भारतीय लोकशाहीत
आज ते मध्यवर्ती बनले आहे. या वास्तवाचा चौफेर अभ्यास करून ते नीट समजून घेतल्याशिवाय
कोणत्याही राजकीय पक्षाला भारतात राजकारण करणे अशक्य आहे. त्यामुळे जाती, त्यांची
परस्परांशी असलेली नाती आणि संबंध, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तपासून पाहणे, त्यात
कालानुक्रमाने होणारे बदल आणि त्यामागील असलेली भौतिक कारणे शोधून काढणे हे
अभ्यासकांपुढील मोठे आव्हान आहे.
मातंग ही जात अस्पृश्य मानली
गेल्यामुळे तिचा समावेश चातुर्वण्य व्यवस्थेत होत नाही. भारतातील सर्व अस्पृश्य
जातींचा समावेश पंचम म्हणून केलेला आहे.