रशियन
क्रांतीचे शतक
लेखक
: अनिल राजीमवाले / अनुवाद : शांता रानडे
किंमत 35 रु. / पाने 40
मार्क्सवादाच्या
मार्गदर्शनानुसार रशियन क्रांती झाली. मार्क्सवादाने दाखवून दिले होते, की समाज भांडवलशाहीकडून समाजवादाच्या
दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे समाज बदललाच पाहिज़े.
मार्क्सने कामगार वर्गाला इतिहासाचा शिल्पकार म्हणून इतिहासाच्या प्रवाहात केंद्रस्थानी
आणले. या कल्पनेच्या मार्गदर्शनानुसार रशियन क्रांतीचे शोषण नष्ट करून समाजवादाची
उभारणी करण्याचा प्रयत्न केला. इथेच तिचे ऐतिहासिकत्व आहे.
मार्क्सच्या
भांडवलशाहीबद्दलच्या संकल्पनांमध्ये आवश्यक ते बदल करून लेनिननी दाखवून दिले, की १९ व्या शतकात दाखवलेल्या मार्गाने
क्रांती घडवता येणार नाही. साम्राज्यवादाने समाजात नवीन स्तर निर्माण केला आहे. तो
स्तर आता जनतेच्या अधिक विभागांचे उत्पादनाचे केन्द्रीयकरण करून आणि बाजार मोजक्यांच्याच
हातात देऊन शोषण करत आहे. कामगारांशिवाय शेतकरी, लहान भांडवलदार, लघु उद्योजक आणि व्यापारी यांचेही
शोषण केले जात आहे.
म्हणून
समाजवादासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यापूर्वी भांडवलदारी लोकशाहीवादी
क्रांती करायला हवी. लेनिनने दाखवून दिले, की साम्राज्यवादच खुद्द भांडवलशाहीच्या वाढीत
अडथळा आणत आहे. प्रथमतः रशियन समाजवादी लोकशाही कष्टकरी पक्षाला लेनिनचे
भांडवलदारी लोकशाहीवादी क्रांतीचे शास्त्र समजलेच नाही. ते हळूहळूच त्यांना समजत
गेले.