Click Image for Gallery
अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधीक कथा
संपादन
– प्रस्तावना : डॉ. एस. एस. भोसले
किंमत 150 रु. / पाने 160
अण्णा
भाऊंच्या साहित्याच्या निर्मितीची बीजे आणि प्रेरणा,
चिंतनाच्या मूठभर कक्षा आणि आकलनाचा आवेग, वास्तवाच्या
मर्यादांचे व्यापकत्व आणि स्वप्नांचे न दिसणारे पाय, कलामूल्यांचे
स्वरूप आणि जीवनदृष्टीचे डोळस आंधळेपण, साम्यवादी
विचारप्रणालीची बांधिलकी आणि आत्मिय अलिप्ततेचे आंधळेपण, दारिद्र्याच्या
निशाणाखाली एकत्रित होऊन जगण्यासाठी पत्करावे लागणारे हौतात्म्य आणि माणूस म्हणून
जगविण्याविषयीचे आवाहन आदी साऱ्या गोष्टींची उकल या अद्वैतात आहे. अण्णा भाऊंना
समजावून घेण्याची ती खूण आहे; त्यासाठी त्या वाटेचे वाटसरू
झाले पाहिजे.