Click Image for Gallery
तणस
लेखक : महेंद्र कदम
किंमत 300 रु. / पाने 228
व्यक्तीची ओळखच पुसून
टाकू पाहणाऱ्या या शतकाने काळाला ताब्यात घेतले आहे. अशा काळालाच नायक करून, देव, देश,
धर्मासह संभ्रमित वर्तमानाला कवेत घेणारी महेंद्र कदम यांची
"तणस" ही कादंबरी गाव-शहराच्या अभावाचा आणि बकालपणाचा कोलाज चित्रित
करते. मानवी अस्तित्वाच्या गूढ शक्यतांचा तळ शोधताना ती काळ आणि अवकाशाच्या अनके
पातळ्यांवर वावरते. शैलीचे आणि निवेदनाचे विविध प्रयोग करूनही ती आपली अंगभूत लय
आणि वाचनीयता कुठेही हरवत नाही.