Click Image for Gallery
ऋतुसंहार
लेखक : संजीव खांडेकर
किंमत ३०० रु. / पाने १७२
एक अभ्यासक या
नात्याने संजीव खांडेकर यांनी
सद्य:स्थितीचा आरसा आपल्यासमोर धरला आहे. त्यात पाहिल्यावर आपण भ्रांतचित्त होणे
साहजिक आहे. इच्छा
असो वा नसो, गेल्या
पंचवीस-तीस वर्षांत भांडवलशाहीच्या अजगराने आपणाला गिळंकृत करून टाकले आहे.
त्याच्यातून बाहेर कसे पडायचे? पडता येईल का? पडू दिले जाईल का? माणसाचे हरवलेले माणूसपण, गमावलेली मानुषता कोणत्या मार्गाने पुन्हा स्थापित होईल? हे लेख वाचताना अशा यक्षप्रश्नांनी अस्वस्थ केले आणि अशी
अस्वस्थता व्यक्तिगत न राहता सार्वत्रिक व्हायला हवी. अशा
लेखांचे मोल म्हणूनच आहे.
- अविनाश
सप्रे