Click Image for Gallery
पुरोगामी
राकेश वानखडे
किंमत 400 रु. / पाने 328
१९९० नंतर लिहिल्या गेलेल्या मराठी
कादंबरीत चिंतनाच्या पातळीवर आमूलाग्र बदल होताना जाणवतो. एकेकाळी आंबेडकरवादी, मार्क्सवादी, देशीवादी किंवा
ग्रामीण अशी लेबले कादंबरीना चिटकवण्याची प्रथा
होती. परंतु आजचे लेखक या
सर्वांची चिकित्सा करून एकमेकांचा समन्वय साधून प्रखर आत्मटीका करू लागले आहेत. जे अस्पष्ट होते ते स्पष्ट करू पाहत होते.
याचे उतम उदारण म्हणून राकेश वानखडे यांच्या या कादंबरीतील नायकाचे देता येईल.