-10% संविधानाचा ‘जागल्या’ : माझ्या आठवणी । Sanvidhanacha Jaglya : Mazya Aathvani

संविधानाचा जागल्या : माझ्या आठवणी । तिस्ता सेटलवाड । अनु. हिरा जनार्दन

पाने : २३२ । किंमत : ३००/- 


दूषित पूर्वग्रहाने पछाडलेल्या समाजाला जातीय हिंसाचाराचे अजिबात वावडे नसते. असा समाज जातीयवादाच्या हातातले बाहुले बनून त्याच्या मर्जीनुसार पवित्रा घेतो. कधी हिंसाचाराचे समर्थन करतो, तर कधी शोकसागरात बुडून जातो. थोडक्यात, प्रतिपक्षाचे बळी गेल्यास हिंसाचार योग्यच असतो आणि स्वपक्षाला हानी बसताच त्यांच्या दुःखाला पारावार उरत नाही. एखादी हिंसक घटना, जाणीवपूर्वक केलेला हल्ला किंवा एखाद्या अपघाताची सत्ताधारी अक्कलहुशारीने वापर करू शकतात, अशी इतिहासाची साक्ष आहे. 'गुजरात २००२' ही त्या इतिहासाची नवीन आवृत्ती आहे. गोध्रातील दुर्दैवी घटनेचा त्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेण्यात आला; किंबहुना त्या वेळी जमावात उपस्थित असलेल्या एका गटातील सर्व जण त्या घटनेस जबाबदार होते, असेच म्हणायला हवे. तरीही एका संपूर्ण जमातीला हिंसेच्या खाईत ढकलण्यासाठी व त्या हिंसाचाराच्या समर्थनासाठी गोध्रा दुर्घटनेचा मोठ्या अक्कलहुशारीने उपयोग करून घेण्यात आला. गुजरात वंशसंहारक हिंसाचाराची कथा ही अशी आहे. तिने गुजरातचा संपूर्णपणे कायापालट केला. तिने माझ्यातही आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यानंतर काही वर्षांनी माझी मुलाखत घेणाऱ्या एका पत्रकाराला मी म्हणाले होते की, ''मला पुन्हा पूर्वीप्रमाणे होणे आता वाटते तितके सोपे नाही.''

- तिस्ता सेटलवाड 

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

संविधानाचा ‘जागल्या’ : माझ्या आठवणी । Sanvidhanacha Jaglya : Mazya Aathvani

  • Views: 6583
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: संविधानाचा ‘जागल्या’ : माझ्या आठवणी
  • Availability: 89
  • Rs. 300
  • Rs. 270
  • Ex Tax: Rs. 270

Tags: संविधानाचा ‘जागल्या’ : माझ्या आठवणी, Sanvidhanacha Jaglya : Mazya Aathvani, राजकीय, सामाजिक