Click Image for Gallery
जयंत पवार यांच्या ‘वरनभात
लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहातल्या कथा वाचल्यानंतर एखाद्या संपणाऱ्या गाण्याची
गुणगुण दीर्घकाळ मनात रेंगाळत राहावी तसे वाटत राहते. यातील पाचही दीर्घ कथांची जातकुळी
वेगळी आहे, पण त्यातून वाहणारा माणसांच्या असोशीचा स्वर मात्र एक आहे. जयंत पवार हे
करू शकतात कारण जीवन आणि वाङ्मय या दोन्हीसंबंधीची त्यांची समजूत गंभीर, सखोल आणि निष्ठा
अभेद्य आहे.