भारतफाळणीविरोधी
मुसलमान । शम्सुल इस्लाम । अनुवाद : हिरा जनार्दन
(
'Muslim Against Partition Of India' या पुस्तकाचा मराठी अनुवाद )
पाने :
२४४ । किंमत : ३५०/-
मुसलमानांच्या बाजूने द्विराष्ट्र सिद्धान्ताच्या प्रभावाखाली असलेल्या नेत्यांमध्ये मोहम्मद अली जिना आणि कवी मुहम्मद इकबाल अशा पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश होता. खरेतर सुरुवातीसुरुवातीला हे दोघेही सज्जन संमिश्र संस्कृतीचे जबरदस्त पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने मुहम्मद इकबाल ह्यांच्या विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. मात्र राजकारणात धर्माचा चंचुप्रवेश झाला की परिस्थिती किती गंभीर वळण घेते, याची साक्ष इतिहासाने वारंवार दिली आहे. अशा परिस्थितीवर मत करण्याचा उपाय अद्याप तरी सापडलेला नाही. राजकारण आणि धर्म एकत्र आले की काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान व मध्यपूर्वेकडील देश होत. त्याचेच थोडेसे सौम्य रूप आज आपण भारतातही पाहत आहोत.
इतिहासात
दडून राहिलेल्या कितीतरी बाबी प्रकाश झोतात आणताना 'भारतातील सगळे मुसलमान एकजात फाळणीला
आसुसलेले पाकिस्तानवादी होते, तर सर्व हिंदूंना एकात्म भारत हवा होता.' ह्या जनसामान्यांच्या
आंधळ्या समजुतीला शम्सुल इस्लाम ह्यांच्या या पुस्तकाने जबरदस्त धक्का दिला आहे. जिज्ञासू
अभ्यासकांच्या व एकूणच समाजाच्या दृष्टीने हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सखोल
संशोधन आणि सत्यशोधनाची तीव्र आंतरिक तळमळ ही ह्या पुस्तकाची खास वैशिष्ट्ये ठरावीत.
ज्यांचा धर्म आणि देवावर विश्वास आहे त्यांच्यासाठी धर्म हा देवाशी नटे प्रस्थापित
करण्याचा शुद्ध खासजी मार्ग असेल. अशा समाजात राहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा व त्यास्तही
तळमळणारा हा लेखक आहे. हे एक असे 'स्वप्न' आहे ज्याला कधी नव्हे इतक्या अंगानी, आव्हानांनी
घेरले आहे !
- प्रा.
हरबन्स मुखिया