मनोरंजक खगोलशास्त्र । लेखक : या पेरेलमन । अनुवाद : प्र. प्रा. संझगिरी
पाने :
२०४ । किंमत : १६०/-
या पुस्तकात
काय वाचाल ?
हे पुस्तक
खगोलशात्रावरील माहिती देते.
तुम्ही
म्हणाल, खगोलशास्त्रावर अनेक पुस्तके आहेत मह हे आणखी एक कशाला ? या पुस्तकाचे वैशीष्ट्य
असे की हे पुस्तक अगदी नवीन नवलपूर्ण दृष्टिकोनातून लिहिले आहे.
वारंवार
सोपे वाटणारे प्रश्न घ्या व त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा बघू. चुकाल हं सांभाळा
!
१. नकाशावर
मुंबई ते केपटाऊनचा सर्वात जवळचा मार्ग कोणता ? तुम्ही म्हणाल, 'हात्येच्या ! त्यात
काय आहे? पट्टी घेऊन जोडा दोन्ही बंदरे ?' - चूक.
२. उत्तर
ध्रुवावर पोहोचलेला वैमानिक परतताना कोणती दिशा घेईल ? तुम्ही म्हणाल, 'हे कसे काय
सांगणार बुवा ! त्याला परत कुठे जायचे आहे ते तर आधी सांगा.' - पुन्हा चूक.
३. दोन
अगदी सारख्या गाड्या ( एक पूर्वेला व दुसरी पश्चिमेकडे ) जात आहेत. त्यांच्या वजनात
किती फरक पडेल ? तुम्ही म्हणाल, 'मुळीच नाही' - पुन्हा चुकलात.
४. फेब्रुवारी
महिन्यात जास्तीतजास्त सोमवार किती ? तुम्ही म्हणाल 'पाच' - पुन्हा चूक.
५. विश्वातील
अत्यंत जड पदार्थ कोणता ? लोखंड ? - चूक
६. चंद्राला
ग्रहण कुठून लागते ? उजवीकडून की डावीकडून ?
७. गुरूच्या
पृष्ठभागावरून आकाशाचे दृश्य कसे दिसेल?
८. तारे
का चमकतात ?
९. पृथ्वीचे
वजन कसे काढले ? सूर्याचे ?
वगैरे वगैरे
या व यांसारख्या
अनेक मनोरंजक प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक अत्यंत मनोवेधक पद्धतीने देईन.
मनुष्य
अंतराळयानातून दूरच्या ग्रहांच्या सफरींची तयारी करू लागला आहे. या काळात खगोलशास्त्राचे
प्राथमिक ज्ञान आवश्यक बनले आहे. ही माहिती या पुस्तकात आढळेल. आणि तीही चित्तवेधक
स्वरूपात.