प्रागतिक
चळवळीचे साथी । जाहिद खान । अनुवाद : कलीम
अजीम
पाने :
२८८ । किंमत : ३५०/-
मुठभरांनी
एखादी कल्पना रचायची आणि ती भाबड्या बहुसंख्याकांना सत्य म्हणून विकायची. समाजातील
सत्ता, संपत्तीची संसाधने मिळवण्याकडे त्यांचे लक्ष जाणार नाही, अशी कप्पेबंद समाजरचनेची
साचेबंद मानसिकता तयार करायची. व्यक्ती व समष्टीचे अवघे जीवन त्या कथित 'सत्या'भोवती
फिरते ठेवायचे. स्वतःचा, सर्वांगांनी फुलत उन्नत जीवन जगण्याचा त्यांना पार विसर पडावा
अशी ही प्राचीन व्यवस्था गेली काही हजार वर्षे इथे ठाण मांडून आहे. ही शोषणाची व्यवस्था
बळकट करण्याच्या या प्रदीर्घ मानसशास्त्रीय युद्धात सांस्कृतिक आयुधे वापरून मेंदू
निकामी केले जातात. अशा निष्क्रिय पण जिवंत मेंदूंना झिणझिण्या आणून सक्रिय करण्याचे
काम देशातील काही प्रतिभावंत साहित्यिक व कलावंतांनी केले. त्यांनी 'कल्पनेच्या सत्या'तून
बाहेर काढत जनसामान्यांना वास्तवाच्या सत्यात आणण्याचे महत कार्य केले. सदर लेखसंग्रह
वाचणे हे समृद्ध भारतीय साहित्य परंपरेशी जोडून घेत स्वतःला जागे करण्याच्या प्रक्रियेत
आणण्यासारखे आहे.