जमातवादी
हिंसा आणि धार्मिक राष्ट्रवाद : भाग २ । राम पुनियानी
पाने :
८८ । किंमत : १००/-
मुखपृष्ठ
: सरदार जाधव
जातीयवाद
आणि जातीयवादी हिंसा या आपल्या देशासाठी शाप सल्याने, अशा जातीयवादी मुद्द्यांवर राजकीय
पक्षांनी आपल्या पोळ्या भजने आपल्या देशाला परवडणारे नाही. आपल्या सामाजिक जीवनातून
असे मुद्दे त्वरित हद्दपार करून टाकणे गरजेचे आहे. राजकारण लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक
मुद्द्यांवर व सर्वांच्या प्रतिष्ठेशी संबंधित मुद्द्यांवर उभारलेले असले पाहिजे.
'शाश्वत जागरूकता ही स्वातंत्र्याची किंमत आहे.' अशी एक प्रसिद्ध महान आहे. भारतात
आपल्याला जातीयवादी मुद्द्यांना सातत्यपूर्णतेत विरोध करायला संकल्प करायला हवा, आपल्या
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विवाद निर्माण करणाऱ्या मुद्द्यांना सातत्याने काढून
टाकण्याचा प्रयत्न करायला हवा.
आपण हे
अनुभवले आहे की, सांप्रदायिक संघटनांना धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल तिरस्कार जागविण्यात
यश आले आहे व त्यामुळे सांप्रदायिक हिंसाचार होतो,समाजात दुफळी माजते व सांप्रदायिक
पक्ष अधिकाधिक ताकदवान होत जातो.
हे लेख
वेगवेगळ्या वेळी घडलेल्या वाढत्या सांप्रदायिक घटनांवर प्रतिक्रिया म्हणून लिहिले गेले.
ते समाजातील सांप्रदायिक संकटावर प्रकाश टाकतात.
- राम पुनियानी