जमातवादाचे
राजकारण आणि भारतीय लोकतंत्र : भाग १ । राम पुनियानी
पाने :
८४ । किंमत : १००/-
मुखपृष्ठ
: सरदार जाधव
हे पुस्तक
मी गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. हे लेख त्या त्या काळी उद्भवलेल्या
व सांप्रदायिक राजकारणाशी निगडित प्रश्नांबाबत आहेत. ते जरी विशिष्ट काळाशी संबंधित
असले तरी सांप्रदायिक राजकारणामागील वैचारिक मांडणी उघडी करण्याचा प्रयत्न करतात. संप्रदायिकता
वरवर जरी हिंदू-मुस्लिम, हिंदू-ख्रिश्चन प्रश्नाभोवती घोटाळत दिसली तरी तिचा गाभा धर्माच्या
अशा मांडणीत आहे ज्यात असमानतेला मान्यता दिली गेली आहे. पुस्तकाचा पहिला भाग संप्रदायिकतेची
ती अंगे उलगडतो ज्यात धर्मावर आधारित ओळख राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरली
जाते. याच भागात धर्माची वेगवेगळी रूपे आहेत यावरही प्रकाश टाकला आहे. धर्माची ती रूपे,जी
जनतेच्या हिताशी जवळीक साधतात, ज्यांत नीतिमत्तेला महत्त्व आहे, ती भारतीय संदर्भात
भक्ती व सुफी परंपरांची आहेत. सध्याच्या बऱ्याच प्रचलित श्रद्धाही धार्मिक भाषेत मांडल्या
जातात. त्यातून असा समज पक्का होऊ लागतो की सर्व पौराणिक कथा खऱ्याच होत्या. या पुराणकथांच्या
एका बाजूला धर्माचा आधार व दुसऱ्या बाजूला ज्ञानाचा आधार करण्यात येत आहे.
- राम पुनियानी