माझी संसदेतील
भाषणे । डॉ. भालचंद्र मुणगेकर । अनुवाद : सविता दामले
पाने :
२२८ । किंमत : ३५०
राज्यसभा-अध्यक्षपदाच्या
माझ्या कार्यकाळातच डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून
संपूर्ण कारकीर्द पार पडली. त्यामुळे त्यांना जाणून घेण्याची आणि सदनाचे सदस्य म्हणून
त्यांनी केलेल्या कामाचे अवलोकन करण्याची उत्तम
संधी मला अध्यक्षपदाच्या आसनावरून प्राप्त झाली.
राज्यघटनेचा मूळ मसुदा तयार करतानाच नामनिर्देशित
श्रेणीतील सदस्यांच्या प्रश्नावर सखोल चर्चा झाली होती; तेव्हा त्या चर्चेत लक्षात
आले होते की निवडणुकीच्या तत्वांचा अंगिकार करतानाच साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा
या क्षेत्रांतील आगळेवेगळे योगदान किंवा प्रत्यक्ष ज्ञान असलेल्या व्यक्तींनाही संसदेत
स्थान असायला हवे. डॉ. मुणगेकरांनी त्यांच्या
कार्यक्षेत्रात या अटींची परिपूर्ती केली होती. त्यामुळे राज्यघटनेतील कलम क्र. ८०(१)(अ) आणि ८० (१)(३) अनुसार भारतीय
प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेत नियुक्ती केली. त्यांच्यावर ठेवलेला
विश्वास डॉ. मुणगेकरांनी सार्थ करून दाखवला.
या खंडात समाविष्ट केलेल्या भाषणांतून डॉ. मुनगेकर
यांच्या आवडीनिवडी प्रतिबिंबित होतात. प्राथमिक, तसेच उच्च शिक्षण, गरिबी आणि सर्वसमावेशक
विकास यांच्याशी संबंधित क्षेत्रीय- प्रादेशिक-सामाजिक पैलू, तसेच आपल्या समाजात ऐतिहासिक
काळापासून वंचित ठेवल्या गेलेल्या समाजगटांशी संबंधित अशा राज्यघटनात्मक मुद्द्यांचा
संपूर्ण परिघ या सर्वांवरील त्यांचे सखोल विचार लक्षात घेण्यासारखे आहेत. आपल्या समाजाचे
यश आणि अपयश या दोन्हींवर त्यांची भाषणे प्रकाशझोत टाकतात आणि ,अत्यंत प्रांजळ व प्रभावी
भाष्य करतात.
एम. हमीद
अन्सारी
१२ फेब्रुवारी,
२०२०
(माजी राज्यसभाध्यक्ष)
नवी दिल्ली.