दिवा देवळाचा । मिर्झा गालिब । अनुवाद : निशिकांत ठकार
पाने : १२२ । किंमत : २२५/-
''चिराग-ए-दैर'' ही गालिबने फारशी भाषेत लिहिलेली तिसरी 'मसनवी'
( कथनपर कविता ) आहे. दिल्लीहून कोलकत्याच्या प्रवासात गालिबचा मुक्काम जेव्हा बनारसला
पडला तेव्हा तो बनारसच्या विलक्षण प्रेमात पडला. बनारसच्या निसर्गाने, सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक
वातावरणाने गालिबला नवचैतन्य मिळाले. हिंदूंचे सर्वात पवित्र स्थान असलेल्या बनारस
म्हणजेच काशीला गालिबने 'पृथ्वीवरचा स्वर्ग', दुनिया के दिल का नुक्ता', 'हिंदूंचा
काबा' अशा शब्दांनी गौरविले.
कवितेचे मर्मज्ञ रसिक आणि अनुवादक निशिकांत ठकार यांनी ''चिराग-ए-दैर''
चा केलेला 'दिवा देवळाचा' हा मुक्त छंदातला मुक्त भाष्यात्मक अनुवाद नितांत सुंदर झाला
आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणात आणि विद्वेषात महाकवी
गालिबची ही महान कलाकृती अर्थपूर्ण आणि अनिवार्य ठरते.