रंग देशोदेशींचे । विजय दिवाण
पाने : १७२ । रंगीत छायाचित्रे, आर्टपेपरवर छपाई । किंमत :
१०००/-
फारसे पर्यटन न करणाऱ्या वाचकालादेखील जगभर फिरून निरनिराळ्या
देशांतील रम्य आणि अनोखी स्थळे समक्ष पाहिल्याची अनुभूती देणारा हा एक वैशिष्ठ्यपूर्ण
छायाचित्रमय ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या लेखकाने स्वतः जगभर फिरून लिहिलेले काही प्रवासवर्णनपर
लेख आणि परदेशांतले काही रंजक अनुभव यात दिले आहेत. अमेरिका, पश्चिम युरोप, मध्य युरोप,
स्कँडिनेव्हिया, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,ग्रीस,तुर्कस्तान, आग्नेय आशियातील
थायलंड, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया अशा निरनिराळ्या देशांतील माणसे, चालीरीती,संस्कृती
आणि अनोखी स्थळे यांची माहिती अत्यंत रंजक पद्धतीने या ग्रंथात दिली आहे. खुद्द लेखक
एक निष्णात छायाचित्रकारही आहे. त्याने स्वतः टिपलेली अत्यंत वेधक छायाचित्रे या ग्रंथातील
लेखांसोबत दिली आहेत. त्यामुळे देशोदेशीची उद्बोधक माहिती आणि रंगीबेरंगी छायाचित्रे
समाविष्ट असणारा 'कॉफी-टेबल बुक' प्रकारातला हा ग्रंथ वाचनीय ठरेल अशी अपेक्षा आहे.