-
Your shopping cart is empty!
पीपल्स बुक हाऊस
केवळ ग्रंथविक्री
नव्हे, ग्रंथचळवळ!
मुंबईच्या
फोर्ट विभागातील फिरोजशहा मेहता रस्त्याला कावसजी पटेल स्ट्रीट नावाचा जो फाटा फुटतो,
त्यावरच्या याझदानी बेकरीला लागून, ब्लिट्झ ऑफिसच्या खाली आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज
फेडरेशनच्या ऑफिससमोर ‘पीपल्स बुक हाऊस’ उभं आहे. १९५३ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाने
खेतवाडीत ‘पीपल्स पब्लिशिंग हाऊस’ची स्थापना केली. त्यातून पुढे १९६० साली ‘लोकवाङ्मय
गृह’ आकाराला आलं आणि १९७३ साली फोर्ट विभागात ‘पीपल्स बुक हाऊस’ सुरू झालं. शहरातल्या
डाव्या इंटलेक्चुअल मंडळींचं हे त्या काळात भेटण्याचं खास एकाण होतं आणि अजूनही ते
तसंच आहे. या दुकानातून पुस्तकं चाळत फिरत असताना कांचा इल्लाय्यांच्या ‘बफेलो नॅशनलिझम’
किंवा कृष्णकुमारांच्या ‘लर्निंग फ्रॉम कॉन्फ्लिक्ट’सारख्या पुस्तकांवरच्या चर्चा तुमच्या
कानावर पडणं सहज शक्य आहे.
या दुकानातील
सुरवातीच्या काळातल्या पुस्तकांवरून त्याचं कम्युनिस्ट आणि सोशॅलिस्ट राजकारणाशी असलेलं
नातं लक्षात येतं. सोविएत रशियाच्या उत्कर्षाच्या काळात रशियातील मीर पब्लिशर्स आणि
प्रोग्रेस पब्लिशर्स यांनी प्रकाशित केलेलं मार्क्सवादी साहित्य आणि इतर पुस्तकं हे
या दुकानाचं वैशिष्ट्य होतं. या पुस्तकांची खास बाब म्हणजे त्यांची कोणलाही परवडणारी
किंमत ही होती. त्या काळात डावे पक्ष कार्यकर्ते, ट्रेड युनियनवाले, राज्यशास्त्र आणि
मानव्यविद्याशाखांचे विद्यार्थी यांचं हे पुस्तकाचं दुकान म्हणजे आकर्षणाचं केंद्र
होतं. एखाद्या सभेच्या किंवा सेमिनारच्या आधी .कवा एखादा कागार लढा सुरू करण्यासाठी
इथे येऊन चर्चा करणं आणि जाताना चे गव्हेराचं .कवा पाब्लो नेरूदाचं नवी आलेलं भाषांतर
विकत घेऊन जाणं सवयीचं झालं होतं. आजसुद्धा अनेक जाणकार मंडळी दुकानात येऊन इथले ‘जगन्मित्र’
व्यवस्थापक गोपाळ पुजारी यांच्याकडे आपल्या कॉम्रेडस्साठी निरोप ठेऊन जातात.
मार्क्स,
लेनिन यांचे कालातीत ग्रंथ तसंच थोर रशियन साहित्यक आणि विचारवंत यांच पुस्तकं इथे,
याच गल्लीतल्या छोट्या चहाच्या दुकानांतून मिळणाऱ्या कपभर चहाच्या किंमतीत मिळायची.
इथे त्या काळात नियमित येणारा आणखी एक वर्ग म्हणजे विज्ञान आणि गणिताचे विद्यार्थी
आणि शिक्षक. रशियन लेखकांनी तत्वचर्चेच्या स्वरूपात आणि अतशिय सुस्पष्ट शैलीत लिहिलेली
या विषयांवरची उत्कृष्ट पाठ्यपुस्तकं अत्यंत कमी किंमतीत मिळत. शाळकरी विद्यार्थ्यांपासून
ते संशोधकांपर्यंत ती सर्वांना प्रिय असत.
सोविएत
रशियाच्या विघटनानंतर जगाची जी नवी रचना निर्माण झाली, तिच्या पीपल्स बुक हाऊसलाही
स्वतच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागलं. दुकानाचा राजकीय पाया डाव्या
विचारसरणीचाच राहिला, मात्र त्यासोबत दुकानात मराठी आणि हिंदी साहित्याचाही मोठ्या
प्रमाणावर समावेश झाला. डाव्या पक्षांची दलित चळवळीशी जी जवळीक विशेषत: महाराष्ट्रता
झाली, तिचंही प्रतिबिंब दुकानातील संग्रहात उमटलं. मार्क्सवादी दृष्टीकोनातून भारताच्या
इतिहासाचा आणि परंपरांचा वेध घेणाऱ्या ग्रंथांचा मोठा साठा दुकानात आहे. पर्यावरणविषयक
पुस्तकांचा एक खास विभागही इथे आहे. लोकवाङ्मय ग्हाच्या प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये
आधुनिक चित्रकलेसंबंधी खूप पुस्तकं दिसतात, पण बहुधा दुकानाचा मध्यमवर्गीय ग्राहकवर्ग
लक्षात घेऊन ती इथे ठेवलेली दिसत नाहीत. किशोरांसाठी नॅशनल बुक ट्रस्ट आणि चिल्ड्रेन्स
बुक ट्रस्टने प्रकाशित केलेली, भारताचं सांस्क्तिक वैविद्ध आणि विविध प्रांतांच्या
वैशिष्ट्यपूर्ण परंपरांची ओळख करून देणारी पुस्तकं इथे आहेत. हीसुद्धा पाकिटाला फार
भार हेणार नाहीत अशा किंमतीची आहेत, हे सांगायला नकोच.
पीपल्स
बुक हाऊस
गोपाळ पुजारी
१५, मेहेर
हाऊस, कावसजी पटेल स्ट्रीट,
याजदानी
बेकरी जवळ, फोर्ट, मुंबई - ४०० ००१
संपर्क
: ०२२-२२८७३७६८ । ७७३८२८७२२९ । ९०२९३९७५८७