Click Image for Gallery
मेटाकुटी । अशोक कौतिक
कोळी
पाने : १७६ । किंमत : ३००/-
मुखपृष्ठ : सरदार जाधव
मेटाकुटी... जगण्यासाठीच्या धडपडीतील सततच्या अपयशाने
आलेली वेदनादायी मरगळ, मरणप्राय दमछाक,आयुष्याची जीवघेणी फरपट,दुर्दशा भोगताना जगण्याची
ओढच संपावी अशी स्थिती, हताशपणा...
ही कहाणी आहे हताश झालेल्या नि मेटाकुटीला आलेल्या किसनतात्या गायकवाड, त्यांची पत्नी काशीबाई आणि मुलगा सोपान यांच्या दुःखमय जीवनाची. त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या गतकाळाच्या वैभवाची आणि वर्तमानातल्या हलाखीची. केवळ त्यांचीच नव्हे,तर त्यांच्यासारख्या अनेकांची, राजकारणी लोकांच्या कुटील डावपेचांची आणि त्यांच्या भूलथापांना भुललेल्या भोळ्याभाबड्या लेकांचीही.