Click Image for Gallery
सोन्याची शाळा । डॉ. सुधीर रा. देवरे
पाने : १४८ । किंमत : २५०/-
मुखपृष्ठ : सरदार जाधव
'सोन्याची शाळा' हा साहित्यातील अभिनव प्रयोग आहे. तो एका बाजूला
साने गुरुजींच्या 'श्यामची आई' ची आठवण करून देतो, तर दुसऱ्या बाजूला भाषांच्या बहुलतेची.
सुधीर देवरे नेहमीच भाषा आणि साहित्य ह्या दोन्ही विश्वात सतत आघाडीवर राहून काम करत
आले आहेत. साहित्यविश्वात 'सोन्याची शाळा' कायम आठवणीत राहील असे नॅरेटिव्ह देवरेंनी
कुशलतेने उभे केले आहे.
ही कादंबरी सजग-प्रगल्भ वाचकांना आपल्या बालविश्वात खेचून नेईल
आणि विद्यार्थीदशेत असणाऱ्या सर्वच कुमार-युवकांनाही नक्कीच आवडेल.
- गणेश देवी