-17% राष्ट्रवाद देशभक्ती आणि स्वातंत्र्य |Rashtrawad, Deshbhakti Aani Swatantrya

राष्ट्रवाद देशभक्ती आणि स्वातंत्र्य

संपादक : कमल नयन काबरा, रणधीरसिंह 'सुमन', ए.के. अरुण

अनुवादक : डॉ. गोरख प्रभाकर काकडे

पाने : १११ । किंमत : १८०

 

देशात राजकीय, धार्मिक अराजकता व आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात फोफावली आहे आणि देश एकाधिकारशाहीकडे, डिक्टेटरशिपकडे वाटचाल करत आहे. संविधानिक मूल्यांची येन-केन प्रकारे पायमल्ली होत असल्याचा क्षणों-क्षणी प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाधित होताना पाहायला, अनुभवायला मिळते. विशिष्ट धार्मिक संघटना, समूह धर्माच्या नावावर, ऐक्याच्या नावावर आपल्या ध्येय-धोरणांना सामान्य माणसाच्या गळी उतरवण्याचा जोरकस प्रयत्न करत आहेत. फॅसीझम बळावत आहे. 'हम करे सो कायदा' मनोवृत्तीने कित्येकांचे प्राण घेतले, कित्येकांना कारागृहात टाकले. अशा एक ना अनेक घटना देशात घडत आहेत.

देशाला इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न ही काही प्रतिगामी विचारधारा, प्रवृत्ती करु पाहत आहेत. त्यांना अपेक्षित असा राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य देशावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितींमध्ये 'राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य' हे पुस्तक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा ठेवूनच याचा हिंदीतून मराठी अनुवाद सुज्ञ वाचकांसाठी प्रस्तुत करत आहोत. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्टपणे मांडते, फॅसीझमची ओळख, त्याची आयुधे वाचकांसमोर प्रकट करते.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

राष्ट्रवाद देशभक्ती आणि स्वातंत्र्य |Rashtrawad, Deshbhakti Aani Swatantrya

  • Views: 3663
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: Rashtrawad, Deshbhakti Aani Swatantrya
  • Availability: 496
  • Rs. 180
  • Rs. 150
  • Ex Tax: Rs. 150

Tags: राष्ट्रवाद देशभक्ती आणि स्वातंत्र्य, Rashtrawad, Deshbhakti Aani Swatantrya, नवे पुस्तक, लेखसंग्रह, राजकीय