भारतीय
विवाह संस्थेचा इतिहास
लेखक : इतिहासाचार्य
वि. का. राजवाडे
किंमत 200 रु. / पाने 120
जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व
स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली, त्यामध्ये मुख्य बिंदू हा आहे. वृत्ती
बांधून देणे म्हणजे काय हा आहे. वृत्तींसामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो
समाज तो जातिबद्ध समाज, जात व वृत्ती ही जोडी साऱ्या समाजरचनेची फ्रेम आहे.
त्याचा मूळ म्हणजे वृत्तीकाराला म्हणजे जाति-कुटुंबाला गावाभोवती
जमिनीचा एक भाग मिळे, शिवाय त्याची समाजोपयोगी वस्तू उत्पन्न करण्याची हत्यारे
असत. ती त्याच्याजवळ असत आणि त्यांच्या वापरातून म्हणजे त्याच्या श्रमातून
जातीवाचक समूहांच्या श्रमाचे फळ गावांतर्गत देवघेवीत मिळे व त्यावर त्याचा संसार व
त्या सर्व वर्णियांचा व जातींचा समाज श्रम आणि कर्मविभागणीनुसार चाले.